"अरे असा संयम सोडून का बोलतोय?", माझा एक पांढरपेशी पुणेरी मित्र माझी समजूत काढत होता. "त्या ल*** माज चढला आहे, बापाचा रस्ता समजतो का ****?", मी संयमच काय पण लाज सोडून ओरडत होता. काही लोक bikes आल्या की पायी चालणाऱ्या लोकांना भलतच तुच्छ समजतात. माझ्या बाजूने एक bike अक्षरशः मला चाटून गेली होती. मी माझा राग माझ्या मित्रावर काढायचं ठरवलं. पण शांत होऊन तोच मला समजवायला लागला. "शिव्या म्हणजे भाषिक हतबलतेची निशाणी आहे." अबे ***, मी मनात म्हणालो. "तुम्ही सोज्वळतेचा भाव आणणारे लोक शिव्यांना अगदीच खालच्या दर्ज्याचे समजतात. पण खर सांगायचा तर उग्र भावना प्रकट करायला शिव्या सर्वात जास्त कामात येतात. तुला जेव्हा खूप राग येईल न तेव्हा कळेल." "पण तृतीय पुरुषी व्यक्तींना संबोधून समोरच्याचा उद्धार करण्यात काय अर्थ आहे?" "तो तृतीय पुरुषी किंवा तृतीय स्त्रीयी उल्लेख हा काही सदैव अर्थार्थी घ्यायचा नसतो, माझा एक मित्र जेव्हा प्रचंड खूष असतो तेव्हा तो जो दिसेल त्याला शिव्या देत सुटतो. पण त्या वेळी शिव्यांचा भाव काही वेगळाच असतो. जर कोणी भयंकर tension मध्ये असतो तेव्हा पण तो शारीरिक अवयवांचा उल्लेख करून त्याची भावनिक परिस्तिथी सांगत असतो.", तुझ्या सारख्या लोकांना अश्या छापील व्याख्याच देलेल्या बऱ्या, मी मनात म्हणालो. "अरे पण असा अभद्र भाषाप्रचार केला तर भाषेची उन्नती कशी होईल? अश्याने समाज रसातळाला जाईल.", माझा मित्र सुसाट बोलत सुटला. च्यायला मी groupdiscussions मध्ये कधीच जिंकत नाही पण याचा अर्थ माझ्या बोलण्यात तथ्य नाही असा नाही. तितक्यात एक pulsar माझ्या मित्राला धक्का देऊन गेली, तो तोल जावून खाली पडला. मी त्याला उचलायला गेलो तेव्हा तो ओरडला ," कुत्र्या, तुझ्या मायची टांग" मी हसत सुटलो. कारण शेवटी पांढरपेशी शर्टावर काळे ठिपके उमटताच.
Sunday, January 22, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Becoming Food Aware
With Covid pandemic causing havoc all over the world, most of the people are spending most of their times indoor. While staying at home mig...
-
You are sitting in front of your laptop and suddenly the urge rises in your mind, to listen to a song. The desperation surprises yourself, ...
-
The gloomy atmosphere in the room was making Rohan uncomfortable. Even though he was in the same house, he felt strongly out of place. He ha...
-
'How could he do this to me?', standing in front of the notice board, Ankit imagined his fraudulent friend lieing him earlier. '...
2 comments:
First sorry for posting a comment in English...still haven't explored the Devnagari Script feature.
After a long time I have read a Marathi article(other than news) and really brilliant. Felt like a Pu la touch to the article.
Good one! Enjoyed reading
Sirji, apne jo compliment diya uske layak nahi hai hum....:)
Post a Comment