Saturday, September 13, 2014

Semi-Annual Roadmap of this blog

मला वाचनाची आवड लागण्यामागे पु.ल. देशपांडे ह्यांच्या पुस्तकांचा फार मोठा हात आहे. त्यांच्या लेखनशैलीचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. त्यांची विनोदबुद्धी, कोटी करण्याची शैली मला भयंकर आवडते. त्यांची प्रवास वर्णने काय सुंदर असायची. त्यांच्या निरीक्षणशक्तीची दाद द्यायला हवी. खर पाहता माझ  पहिल पु.लं च पुस्तक हे एक प्रवासवर्णन होत. 'जावे त्यांच्या देशा'. व्हेनिस, हंगेरी , सान-फ्रान्सिस्को अश्या नानाविध ठिकाणांवर जाऊन तिथल्या संस्कृतीच, तिथल्या लोकांबद्दल पु.ल यांनी लिहिलेल्या गोष्टी वाचल्या की इतके सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे राहतात कि कोणत्या हॉलीवूड चित्रपटात इतक सुंदर चित्रीकरण सापडणार नाही. अनेक वर्षांपासून माझ्या पण मनात एक सुप्त इच्छा होती की मी देखील असा प्रवासवर्णन लिहावं. यंदा जेव्हा मी मॉरीशस ला गेलो (यंदा म्हणजे तस पाहता तर मी पहिल्यांदाच गेलो!) तेव्हा मी अगदी निर्धार केला होता की प्रवासवर्णन लिहीणारच. त्या प्रवासाला आता ८ महिने झाले पण आजून योग आला नाही… बहुधा ९व्या महिन्यात माझ blog child होईल अशी आशा आहे.

जितक सुंदर पु.ल. जागांबद्दल, संस्कृतींबद्दल लिहितात तेवढंच सुंदर ते माणसांबद्दल लिहितात. 'व्यक्ती आणि वल्ली' हे पु.ल. च masterpiece माझ सगळ्यात आवडत पुस्तक आहे. तस काही मी माझ्या मित्रांबद्दल लिहेल अशी college च्या दिवसांमध्ये माझी महत्वाकांक्षा होती. असो, गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या फेसबुकच्या newsfeed वर Humans of NewYork चे photos पाहत होतो. माझ्या अनेक मित्रांनी त्या पेजला लाईक केला होता. मी मात्र खूप skeptically विचार करत होतो की 'काय आहे यार हे HONY, इतका काय गवगवा करतात लोक त्याचा?', पण नंतर जेव्हा मी ते photos पाहणं सुरु केल तेव्हा त्यातला brilliance मला समजून आला. काय भारी concept आहे… brandon नावाच्या एका छायाचित्रकारानी New York मधे जागोजागी जाऊन वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांचे छायाचित्र काढले. आपल्या photoblog वर त्याने ते छायाचित्र आणि त्या व्यक्तीसोबत केलेल्या संवादाचा संक्षेप लिहिला. लोकांची स्वप्ने, प्रेरणा, अडचणी त्यांच्या डोळ्यातून आणि शब्दातून मांडण्याचा हा प्रकार मला प्रचंड भावला. मी स्वतः पण अनेक दिवसांपासून असच काहीसं करण्याच्या विचारात होतो.

पुढील दोन महिन्यात मी वरील दोन गोष्टी माझ्या blog वर करण्याचा प्रयत्न करील. कारण कोण्या हुशार मनुष्याने म्हटल आहे.
Imitation is the best form of flattery. 

No comments:

Becoming Food Aware

With Covid pandemic causing havoc all over the world, most of the people are spending most of their times indoor. While staying at home mig...